Email: info@cnkmpune.in | Call: +91 9021317877

Bal Chitrakala

बालचित्रकला: लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया

‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ईशान, हा सगळ्यांनाच आवडला होता. शब्दांमध्ये गल्लत घालणारा, अबोल, असा तो लहान मुलगा, चित्र मात्र आत्मविश्वासाने काढतो. जे त्याला शब्दांतून व्यक्त करता येत नाही, ते तो आकारांमधून, रंगांमधून सांगतो. त्याची निरीक्षणे, गोष्टींकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टीकोन, त्यातून बाहेर येतो.

इशानचे उदाहरण विशिष्ट आहे, कारण तेथे डिस्लेक्सियाचा संदर्भ होता. मात्र सर्वसामान्य लहान मुलांच्या बाबतसुद्धा, हे तितकेच खरे आहे, की ते फक्त शब्दांमधून व्यक्त होत नाहीत. त्यांची दृष्टी ही अनेक गोष्टी टिपत असते; जगाचे आकलन ते विविध अंगांनी करत असतात. त्यामुळे शब्दांच्या ज्ञानाबरोबरच, त्यांच्या कलात्मक अंगाची वाढ होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मुले आणि चित्रकला

लहान मुले त्यांच्या सर्वच इंद्रियांमधून ज्ञानार्जन करत असतात. कानावाटे जसे ते ध्वनी आणि नंतर शब्द समजून घेऊ लागतात, तसेच डोळ्यांच्या माध्यमातून ते रंग, आकार, पॅटर्न्स टिपतात. ही उपजत क्षमता अर्थातच आपल्या सगळ्यांमध्ये आहे. लहान मुलांच्या बाबत मात्र ती अधिक तीक्ष्ण असते. त्यांच्या  संवेदना अधिक जागृत असतात. त्यामुळे त्यांची दृष्टीसुद्धा वेगळी असते.  

याचमुळे, त्यांच्यातील कलात्मक अंगाचा विकास होण्यासाठी ५ ते १२ हे वय अतिशय महत्त्वाचे आहे. जे त्यांना उपजतच येते, ते तंत्राच्या, सरावाच्या माध्यमातून अधिक चांगले, अधिक परिपूर्ण करता येऊ शकते. भाषेच्या माध्यमातून जे त्यांना व्यक्त करता येत नाही, ते चित्रकलेतून व्यक्त होऊ शकते. या प्रकारे, त्यांचे व्यक्तिमत्वसुद्धा अधिकाधिक फुलत जाते.

सीएनकेएम बालचित्रकला (ChildART)

या सर्व मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करून, ‘चित्रलीला निकेतन कला महाविद्यालया (सीएनकेएम)’ने ‘बालचित्रकला’ हा कोर्स विकसित केला आहे. लहान मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या भोवतालाचे भान देणे, त्यांची निरीक्षणशक्ती तीक्ष्ण करणे व त्यांचा दृष्टीकोन व्यापक बनविणे, ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट्ये आहेत. हा कोर्स दोन वयोगटांसाठी घेतला जातो:

  • ५ ते ८ वर्षांच्या मुलांसाठी
  • ९ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी

सर्व वयोगटांसाठीच्या बॅचेस, या जुन ते मार्चपर्यंत असतात. तसेच सुट्ट्यांमध्येदेखील वर्ग घेतले जातात. बालचित्रकला पूर्ण केलेला विद्यार्थी, एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासनमान्य ‘ड्रॉईंग ग्रेड’ परीक्षेला बसण्यास पात्र होतो.

या कोर्सची काही ठळक वैशिष्ट्ये अशी:

कौशल्याचा विकास
अनेक मुलांमध्ये उपजतच चित्रकलेचे अंग असते. ‘बालचित्रकला’ या गुणांना कौशल्याचे स्वरूप देते. चित्र काढण्याची, रंगविण्याची विविध तंत्रे शिकवून, त्यांच्या कलेला अधिक धारदार बनविते. तसेच क्ले क्राफ्ट, पेपर क्राफ्ट यासारख्या गोष्टींमुळे मुलांची ‘मोटर स्किल्स’ विकसित होण्यास मदत होते. मुलांना पुढे जर चित्रकला व्यावसायिक स्वरूपात करायची असेल, तर त्याचा पाया इथेच तयार होतो.

कलात्मक दृष्टिकोनाचा विकास
‘सीएनकेएम’च्या सर्वच अभ्यासक्रमांचा मूळ उद्देश, हा आपल्यातील कलात्मकतेचा विकास आहे. ‘बालचित्रकला’मध्ये सुद्धा, मुलांना तंत्राबरोबरच कलात्मक दृष्टीकोनही दिला जातो. किंबहुना, त्यांच्यात मुळातच असणाऱ्या या क्षमतेचा व्यापक दृष्टीने विकास केला जातो

Post a Comment